क्राईम
बिग ब्रेकिंग! औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन केल्याचा राग

- राज्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान एक गट मोठ्या संख्येने नागपूरच्या शिवाजी चौकच्या जवळ पोहोचला.
- त्यानंतर घोषणाबाजीला सुरूवात झाली. त्यानंतर दोन गटांत मोठा राडा झाला. या घटनेमुळे नागपूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. दुपारी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता. एका गटाने घोषणाबाजी करताच परिसरातील दुसऱ्या गटाने देखील लगेच घोषणाबाजी सुरू केली.
- घटनास्थळी प्रचंड तणावाचे वातावरण आहे. रस्त्यावर पोलीस गर्दी नियंत्रित करत आहे. त्यादिशेने जोरदार दगडफेक होत आहे. पोलीस तरूणांना थांबवत आहे. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी पोहोचली आहे. समोरच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर दगडफेक होत आहे. आक्रमक तरूणांनी वाहनांची जाळपोळ मोठ्या प्रमाणावर केली.
- सकाळी औरंगजेबाच्या कबरीविरोधात नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आले, यानंतर आता सायंकाळी दोन गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. संतप्त जमावाने दगडफेक करत वाहनांची तोडफोड सुद्धा केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाल परिसरात सध्या तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला.