क्राईम

ब्रेकिंग! एसटी-कारच्या समोरासमोर धडकेत चार ठार, तीन गंभीर

लग्नसोहळा आटोपून नांदगाव खंडेश्वर येथून कारने यवतमाळकडे निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. नेर शहराजवळ भरधाव कार एसटी बसला धडकून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. हा अपघात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला.

चालक तरुण व त्याच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन जखमींवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविण्यात आले आहे. राधेश्याम अशोक इंगोले (२६), रजनी अशोक इंगोले (४५) दोघे (रा. रुपनगर वडगाव रोड, यवतमाळ) वैष्णवी संतोष गावंडे (१८), सारिका प्रमोद चौधरी (२८) (रा. पिंपळगाव जि. वाशिम) अशी मृतांची नावे आहेत. तर साक्षी प्रमोद चौधरी (१९), प्रमोद पांडुरंग चौधरी (४५), सविता संतोष गावंडे (४४) हे तिघे गंभीर जखमी आहे. एसटी बसमधील दोन प्रवासीही जखमी झाले आहेत.

Related Articles

Back to top button