राजकीय
ब्रेकिंग! दिवाळीत भाजपने पहिला बॉम्ब फोडला

- सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत भाजपाने राजकीय बॉम्ब फोडला आहे. प्रचाराची धामधूम सुरू होण्याआधीच भाजपाने मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता गळाला लावला आहे. मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते रवी राजा यांनी भाजपात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. राजा यांनी आपला राजीनामा थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला आहे. आपण काँग्रेसमधील 44 वर्षांचा राजकीय प्रवास थांबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
- राजा हे काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची चांगली कामगिरी राहिली आहे. राजा हे सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेस पक्षाने गणेश यादव यांना संधी दिली. त्यामुळे राजा यांनी नाराजी व्यक्त केली.
- राजा हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र, आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राजा यांचा सायन-प्रतिक्षा नगर भागात चांगला संपर्क आहे. याठिकाणी ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते.