महाराष्ट्र

ब्रेकिंग! एसटीचा प्रवास महागला

सोलापूरसह इतर भागातील प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण एसटी बसने प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच प्रलंबित असलेल्या दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे एसटीच्या तिकीटात 14.95 टक्के दरवाढ होणार आहे.

आजपासूनच एसटीचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. राज्यातील परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत एसटी बसच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली. आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

Related Articles

Back to top button