राजकीय

राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री, संजय राऊतांचा नवीन बॉम्ब

  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तोफ दिवसागणिक आग ओकत आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी शिंदे गटच फुटीवर असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली. दावोस दौऱ्यात महाराष्ट्रीतील गुंतवणुकीची चर्चा न होता महायुतीमधील भूकंपाची चर्चा अधिक रंगली. दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाला भगदाड पाडण्याचा दावा केला आहे. तर आज राऊत यांनी सकाळीच मोठा बॉम्ब टाकला. राज्याला नवीन तिसरा मुख्यमंत्री मिळणार असल्याचा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.
  • एकनाथ शिंदे यांचे प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा. काल मुख्यमंत्री होते, आज उपमुख्यमंत्री आहेत. उद्या तेही राहणार नाही. कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतोय. तो त्यांच्याच पक्षातील आहे. त्याचा त्यांनी विचार करावा. मी नाव घेत नाही. पडद्यामागे सुरू आहेत. एका राज्याला तीन उपमुख्यमंत्री मिळणार आहे. यांचे वजन होते कुठे. टायरमध्ये पंपाने हवा भरतात, तसे अमित शहा यांनी तयार केलेले हे नेते आहेत, असा बॉम्ब राऊत यांनी टाकला.

Related Articles

Back to top button