महाराष्ट्र
ब्रेकिंग! धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर गरजेचा नाही
- प्रार्थना किंवा धार्मिक प्रवचनासाठी लाऊडस्पीकरचा वापर करणे हा कोणत्याही धर्माचा अत्यावश्यक भाग नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
- न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आणि कोणत्याही धार्मिक स्थळांकडून ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची खात्री करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
- कुर्ला व चुनाभट्टी येथील रहिवाशांनी त्यांच्या परिसरातील मशिदी व मदरशांमधील भोंग्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास होत असल्याची तक्रार न्यायालयाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने वरील निर्देश दिले आहेत.
- ध्वनिप्रदूषणास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई पोलिसांना आहेत. त्यामुळे पोलिसांकडे स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर ते कशी कारवाई करणार, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखावीत. ज्या धार्मिक स्थळांविरोधात तक्रार आली आहे, त्यांना आधी समज द्यावी. पुन्हा तक्रार आल्यास कायद्याअंतर्गत दंड ठोठावा आणि तिसऱ्यांदा तक्रार आली तर लाऊडस्पीकर जप्त करावा, तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.