सोलापूर

ब्रेकिंग सोलापूर! डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात

  • आज सायंकाळी जुना बोरामणी नाका येथे भीषण अपघात झाला आहे. डंपर आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एम एच 13 बी डब्ल्यू 74 25 आणि डंपर क्रमांक एम एच पंचवीस एफ 1111 या वाहनांचा अपघात झाला आहे. या भीषण धडकेत भारत वीर स्वामी वय 71 राहणार जुना घरकुल हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या मार्गावरील जड वाहतुकीला आळा कधी बसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

Back to top button