देश - विदेश

ब्रेकिंग! चीनमध्ये पसरणारा व्हायरस भारतासाठी किती धोकादायक?

जगभरात पाच वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. चीनमधूनच हा व्हायरस जगभरात पसरला असे सांगितले गेले. आताही अशीच एक धक्कादायक बातमी चीनमधूनच आली आहे. चीनमध्ये सध्या एचएमपीव्ही व्हायरस वेगाने फैलावत आहे.

दरम्यान भारतीय आरोग्य सेवांचे महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांनी मात्र चिंतेचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोयल यांनी दिलेल्या माहितीत, भारतात या व्हायरसच्या संसर्गाची फार प्रकरणे समोर आली नसल्याचे म्हटले आहे.

हा एखाद्या सामान्य विषाणूसारखा असून तो श्वसन नलिकेला संसर्ग करतो. परिणामी सर्दीसारखे आजार होऊ शकतात. एका वर्षापेक्षा कमी वयाची मुले आणि ज्येष्ठांमध्ये याच्या संसर्गामुळे फ्लूसारखी लक्षणे पाहायला मिळू शकतात.

पण त्यामुळे कोणताही गंभीर परिणाम होत नसल्याने फारशी चिंतेची बाब नाही. हिवाळ्याच्या काळात तसेही सर्दीच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. आपली आरोग्य यंत्रणा या स्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असे गोयल यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button