पृथ्वीजवळील सर्वात जवळचा ग्रह चंद्राच्या बाबतीत महत्वाची बातमी समोर आली आहे. या चंद्राच्या जमिनीवर पहिल्यांदा नील आर्मस्ट्राँग ज्या ठिकाणी उतरले होते, तेथून चारशे किलोमीटर अंतरावर एक गुहा सापडली आहे. या गुहेमध्ये पुढील काही वर्षात मानवी वावर सहज शक्य आहे, असे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.
इटलीच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वातील पथकाने हा नवा शोध जारी केला आहे. अपोलो 11 हे अमेरिकेचे अवकाश यान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले होते तेथून जवळपास चारशे किलोमीटर अंतरावर सी ऑफ ट्रान्क्विलिटी या भागात एक मोठी गुहा आढळून आली आहे.
या भागात दोनशेपेक्षा जास्त विवरे आहेत, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नासाच्या ल्युनार रिकनेसान्स ऑर्बिट या उपकरणाद्वारे येथील परिसराचे विश्लेषण करण्यात आले.
दरम्यान या अगोदर ऑगस्ट 2023 मध्ये भारताचा विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरला होता.

चंद्राचा दक्षिण ध्रुव म्हणजे अत्यंत थंड आणि वातावरणाच्या दृष्टीने कठीण प्रदेश आहे. त्यामुळे भारत या भागामध्ये लँडर उतरवणारा पहिला देश ठरला. तर आता अमेरिकेनेदेखील आपले यान दक्षिण ध्रुवावर उतरवून अपोलो मिशननंतर तब्बल 50 वर्षांनंतर चंद्रयान अभियान सुरू केलं आहे. या अगोदर 1972 मध्ये अमेरिकेकडून हा प्रयत्न करण्यात आला होता.