राजकीय
ब्रेकिंग! अरेरे…ठाकरेंची पहिली यादीच चुकली?

- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, काही वेळातच झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत या यादीत प्रशासकीय चूक असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे ही यादी अंतिम आहे की यातील उमेदवारांच्या नावात काही बदल होणार आहे याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
- ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत काही वादग्रस्त जागांचाही समावेश आहे. यातील काही जागांवर काँग्रेसनं तर काही जागांवर अन्य छोट्या पक्षांनी दावा केलेला आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत राऊत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या यादीत काही दुरुस्त्या आहेत. त्यात काही प्रशासकीय चुका आहेत. हे कसं झालं हे आम्ही उद्या तपासून पाहू आणि त्यावर नव्यानं चर्चा करू, असे राऊत म्हणाले. आमच्या यादीत शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित जागा आल्या आहेत. काही राष्ट्रवादी व काँग्रेसशी संबंधित जागा आहेत. त्यावर आम्ही नक्कीच चर्चा करू, असे राऊत यांनी सांगितले.