महाराष्ट्र
औरंगजेबाच्या मुलीमुळे राजघराण्याचा आब राखला गेला

- ‘छावा’ सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासाची जोरदार चर्चा सुरू आहे. विकी कौशलच्या मुख्य भूमिकेसह या चित्रपटात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अनेक इतिहासतज्ज्ञ, अभ्यासक, आणि कलाकार सोशल मीडियावर विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडत आहेत. अशातच आता अभिनेते किरण माने यांनी देखील परखड मत मांडले आहे.
- अभिनेते माने सोशल मीडियावर परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी नुकतीच छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी औरंगजेबाच्या मुलीची भूमिका अधोरेखित करत एक वेगळा दृष्टिकोन मांडला आहे.
- त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, औरंगजेबाची मुलगी बेगम झीनत-उन-निसा हिने छत्रपती शाहूंना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले. ती कनवाळू होती. छत्रपती शंभूराजे धारातिर्थी पडले तेव्हा छत्रपती शाहूंचे वय होते अवघे पाच वर्षांचे! महाराणी येसूबाई औरंगजेबाच्या कैदेत असताना औरंगजेबाची मुलगी झीनत हिने छत्रपती शाहूंचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. येसूबाईंचीही सख्ख्या बहिणीसारखी काळजी घेतली. झीनतमुळे कैदेत असूनही येसूबाई आणि शाहू या दोघांच्याही राजघराण्याचा आब राखला गेला.