क्राईम

मदत मागण्यासाठी आलेल्या तरुणीला केले प्रपोज

प्रेम प्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच शारीरिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार भंडाऱ्यात घडला असून फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनंतर भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपुरात शिक्षण घेत असताना तिची उमेशरत्न नावाच्या मुलाशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेशी शारीरीक सबंध प्रस्थापित केले. त्यावेळी त्या दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र, पीडितीने प्रियकराकडे लग्न करण्याचा हट्ट धरला तेव्हा त्याने टाळाटाळ केली. परिणामी तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र सुदैवाने ती बचावली. त्यानंतर तिने प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

पीडितेने प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलिस अधिकारी बागुल यांच्याकडे गेली. फिर्यादी तरुणीने सर्व हकिकत सांगितल्यावर आरोपी बागुल याने तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केली.

यावेळी बागुलने तू सुंदर आहेस. आत्महत्या करू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला मदत करेन. पण माझी एक अट आहे. तू आणि मी क्लोज फ्रेंड राहू. तुझे आयुष्य बदलेन. तू सुशिक्षित आणि सुंदर आहे. मी अजूनही तरुण आहे. आपण डेटवर जाऊ. तू मला त्यासाठी मदत कर, मी तुला कधीच एकटे सोडणार नाहीस. माझ्या वयावर जाऊ नको, मी तुला आयुष्यभर सांगाळेन. हे तू कुणाला सांगू नको, असे म्हणत बागुल याने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बागुल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button