क्राईम
पेट्रोल बॉम्ब ते देव-देवतांचे विडंबन! नागपुरात काय घडले?

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात झालेल्या दंगलीचा ए टू झेड घटनाक्रम सांगितला. सोमवारी रात्री नागपुरात झालेली घटना ही घटना दुर्दैवी होती. मोमीनपुरा महाल भागात जमावाने एकत्र येवून काही घरांना लक्ष्य केले. शिवाय जाळपोळ केली. मोठ्या प्रमाणावर त्या भागात मालमत्तेचे नुकसान केले. काही लोक तर जीवानिशी वाचली, असे शिंदे यांनी सांगितले. तो क्षण अंगावर काटा आणणारा होता, असेही ते म्हणाले.
- ज्यावेळी हिंसाचार होत होता, त्यावेळी तिथे पोलीस आले. त्यांच्यावरही दगडफेक झाली. चार डीसीपी हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. काही लोकांनी तर पोलीसांवर कुऱ्हाडीने वार केले. त्यांच्याकडे हत्यारे होती. या हल्ल्यात पेट्रोल बॉम्ब टाकले गेले. या सर्व बाबी पाहाता हा सर्व पूर्व नियोजित कट होता, असेही शिंदे यांनी सांगितले.
- मोमीनपुरात या भागात मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्या जातात. पण दंगली वेळी एकही गाडी त्या ठिकाणी पार्क नव्हती. त्यानंतर नियोजन पद्धतीने दगडफेक केली गेली. या हल्ल्यात लहान मुलांकडेही पाहीले नाही. त्यात एक पाच वर्षाची मुलगी बचावली आहे. त्याठिकाणी एक हॉस्पिटल आहे. त्यालाही लक्ष्य केले गेले. हॉस्पिटलमध्ये असलेल्या देव-देवतांची विडंबना केली गेली, असे शिंदे यांनी सांगितले.