तीन महिन्यांनी होणार होते धुमधडाक्यात लग्न पण…
राज्यात तुळशी विवाहानंतर लग्नांना सुरुवात होणार आहे. तत्पुर्वीच लग्न जमली आहेत आणि मुहुर्त मात्र तुळशी विवाहानंतरची आहेत. अशात एका लग्न जन्मलेल्या तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरूणीला एक फोन कॉल आला होता आणि त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. ज्योती असे या 22 वर्षीय तरूणीचे नाव आहे.
उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये ही घटना घडली आहे. बबेरू कोतवाली क्षेत्रातील दतौरा गावात शिवपूजन वर्मा त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत आहेत. शिवपूजन यांची ज्योती ही सर्वात लहान मुलगी होती. ज्योतीचे वडिलांनी चित्रकुटमध्ये लग्न जमवले होते आणि 29 फेब्रुवारी रोजी नवरा मुलगा तिच्या घरी वरात घेऊन येणार होता. मात्र, अचानक मुलाकडच्या कुटुंबियांनी ज्योतीच्या कुटुंबियाला लग्नास नकार कळवला. या नकारामुळे ज्योती प्रचंड मानसिक तणावात होती आणि यातूनच तिने आत्महत्या केली.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मुलांच्या कुटुंबियांकडून एक फोन कॉल आला होता. या फोन कॉलवर त्यांनी लग्नास नकार दिलाआणि नाते तोडत असल्याचे सांगितले. ही बाब ज्योतीला कळताच ती मानसिक तणावात आली होती. या तणावातून ज्योतीने स्वत:ला एका खोलीत बंद केले. त्यानंतर गळफास घेतला.