राजकीय

‘राष्ट्रवादी’ सरड्या सारखे रंग बदलते; प्रकाश आंबेडकरांची टीका

राष्ट्रवादी सरड्यासारखा रंग बदलते. आता चर्चा सुरु झाली आहे की भाजपसोबत आज जातील की उद्या जातील, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. बदलापूर येथे बौद्ध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. गेली ३० वर्षे वाया गेली आहेत. धर्मांदांना वैचारिक आणि राजकीय विरोध करतील असं वाटलं होतं. तेच आज भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मांडीला मांडी लावून बसायला तयार झाले आहेत, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.
ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यावे की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यास आमचा विरोध नाही.
जागा वाटपात ठाकरे गटाने त्यांच्या जागा वंचित आघाडीला द्याव्यात, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. तसेच कॉंग्रेसनेही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यास होकार दिला होता.
मात्र सध्या अजितदादा हे भाजप सोबत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. हे वृत्त अजितदादा यांनी फेटाळून लावले आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यामुळे नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button