- राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान एक अत्यंत संतापजनक प्रकरण उघडकीस आले असून एका विवाहित महिलेवर गुंगीचे औषध पाजून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी एका बहिण-भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात ही घटना घडली आहे.
- पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, आरोपी सचिन ज्ञानेश्वर चोपडे याने फिर्यादी महिलेला घरी बोलावले. तिथे त्याने महिलेला चहातून गुंगीचे औषध पाजून ती शुद्धीत नसताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
- इतक्यावरच आरोपी थांबला नाही. त्याने पीडित महिलेचे नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढले. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने महिलेचे शोषण सुरू ठेवले. या धक्कादायक प्रकरणात आरोपीच्या बहिणीला या सर्व कृत्यांची माहिती असूनही तिने गुन्हा लपवून आरोपीला सहकार्य केले, असे पीडितेने म्हटले आहे. या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चहा प्यायला घरी नक्की या…
