- सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील शिशु वर्गातील चिमुरड्या मुलीवर गेल्या सहा महिन्यापासून अत्याचार करणाऱ्या त्या शाळेतील कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात यावे व संबंधित शालेय प्रशासनावरही कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्यावतीने जिल्हाध्यक्षा मीनल दास यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना देण्यात आले.
- बदलापूर येथील अत्याचाराची घटना ताजी असताना सोलापूर शहरांमध्ये हा प्रकार घडलामुळे शालेय विद्यार्थी व पालक अतिशय भयभीत झाले असून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असतानाही अनेक शाळेमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही. तसेच अनेक शाळेमध्ये विशाखा समिती व तक्रारपेटी फक्त कागदोपत्री दाखवण्यात आलेली आहे. याकडे शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. विशाखा समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्यात यावे असे असताना सुद्धा अनेकवेळा बैठका झाल्या नाहीत, असे प्रकार वरचेवर वाढत जात आहेत. शाळेमध्ये शक्यतो प्रसाधनग्रहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात यावे, अश्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत
- यावेळी संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे, शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव, मोनाली धुमाळ, मनिषा कोळी आदी उपस्थित होते.
सोलापूर! नामांकित शाळेतील चिमुरड्या मुलीवर सहा महिन्यापासून अत्याचार
