महाराष्ट्र कर्नाटक सीमेचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत आहे. त्यातच काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा ठोकला होता. जत तालुका कर्नाटक यावा, अशी तेथील नागरिकांची मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
यावरून शिंदे सरकारवर विरोधकांनी चौफेर टीका केली होती. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. इतकेच नव्हे तर कर्नाटकातील निपाणी आणि बेळगाव महाराष्ट्रात घेण्याचा आपला प्रयत्न राहील, असे चॅलेंज फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिले होते.
दरम्यान फडणवीस यांच्या वक्तव्याला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिउत्तर दिले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर फडणीस यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील सोलापूर व अक्कलकोट हे भाग कर्नाटकात येण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असा मोठा दावा त्यांनी केला.