काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

Admin
1 Min Read
  • भारतीय हवामान विभागाने २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा दिला आहे. कोकण, मराठवाडा, सोलापूर आणि मध्य महाराष्ट्रात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराचा धोका असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नमूद केले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे पुन्हा काही दिवस मुसळदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. घाट परिसरात दरडी कोसळण्याची आणि फ्लॅश फ्लडची शक्यता असून, नद्यांच्या प्रवाहावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. प्रत्येक जिल्ह्यात २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश आणि शहरी सखल भागात पाणी उपसा पंप, जुन्या धोकादायक इमारतींसाठी सुरक्षा उपाय तसेच वीज आणि रस्ते दुरुस्ती पथके तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
Share This Article