- सध्या इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मध्य पूर्वेमधील तणाव चांगलाच वाढला आहे. मात्र, याच दरम्यान आता इस्रायलला मोठा धक्का बसला आहे, तर इराणचे पारडे जड होताना दिसत आहे. अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू असलेल्या चीनने या वादात आता मोठे पाऊल उचलले आहे.
- चीन या युद्धात इराणसोबत उभा राहिला आहे. इस्रायलकडून सुरू असलेली ही कारवाई विनाशकारी असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांना फोन केला आहे. इस्रायलकडून सुरू असलेल्या कारवाईचा निषेध करत चीनने ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे.
- इराणच्या अणू केंद्रांवर हल्ला करून इस्रायलने आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन केले आहे. इस्रायलकडून ज्या पद्धतीचे हल्ले होत आहेत, त्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र युद्धाच्या खाईमध्ये ढकलले गेले आहे, असे यावेळी अराघची यांनी सांगितले.
- दरम्यान इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डला उद्ध्वस्त केले आहे. इस्रायलच्या या कृतीमुळे संपूर्ण जगाचीच चिंता वाढली आहे.
- इराणमधील साऊथ पार्स गॅस फिल्डमध्ये गॅसनिर्मिती केली जाते. इस्रायलच्या हल्ल्याचे हे ठिकाण जगातील गॅसनिर्मिती करणाऱ्या ठिकाणांमध्ये सर्वाधिक मोठे ठिकाण आहे. याच ठिकाणाहून जगातील अनेक देशांना नैसर्गिक वायू पुरवला जातो.
- इस्रायलने इराणच्या ज्या ठिकाणावर हल्ला केला आहे, त्या ठिकाणावर कतारचा मोठा वावर असतो. कतारमध्ये या ठिकाणाला नॉर्थ फिल्ड असे म्हटले जाते. सद्यस्थितीला भारत या ठिकाणाहून नैसर्गिक वायूची खरेदी करत नाही. पण इस्रायलच्या या हल्ल्याचा परिणाम भारतातील नैसर्गिक पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ब्रेकिंग! इस्रायलने टाकले भयानक पाऊल, जगातील सर्वात मोठे गॅस फील्ड उद्ध्वस्त
