- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलांनी अवंतीपोराच्या त्राल भागात दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असल्याची माहिती मिळत आहे. हे दहशतवादी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आले होते. परंतु अद्यापपर्यंत कोणीही मारले गेल्याचे वृत्त नाही. दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षा दलांनी आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांना ठार मारले आहे.
- जम्मू-काश्मीर पोलिसांनी आज सकाळी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून चकमकीची माहिती दिली. काश्मीर झोन पोलिसांनी त्यांच्या एक्स हँडलवर लिहिले आहे की, अवंतीपोराच्या त्राल भागातील नादेरमध्ये पोलिस आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी चकमक सुरू केली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. ते इतर ठिकाणी शोध मोहीम राबवत आहेत आणि दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन दहशतवादी असल्याचे समजते.
- मंगळवारीही सुरक्षा दलांनी चकमक केली होती. त्यांनी सकाळी शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांना घेरले होते आणि नंतर त्या तिघांनाही ठार मारले होते.
पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक
