- भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असतानाच आता बलुचिस्तानने डोक वर काढले आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा बलोच लिबरेशन आर्मीकडून करण्यात आली.
- बलोच नेता मीर यार बलोच याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करीत पाकिस्तानपासून स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केली आहे. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा ट्रेंड सुरु आहे.
- मीर यार बलोच एक लेखक असून स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणाऱ्या बलोच लिबरेशन आर्मीचा तो नेताही आहे. पाकिस्तानापासून बलुचिस्तान स्वातंत्र्य झाल्याचे त्यांनी घोषित केले असून यासोबतच दिल्लीत बलुचिस्तानचे स्वतंत्र उच्चायुक्त सुरु करण्यात यावे, अशी मागणीही मीर यार बलोच यांनी केली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांनी आपली शांती सेना बलुचिस्तानमध्ये पाठवून पाकच्या सैन्याला त्यांच्या सीमेमध्ये पाठवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मोठी बातमी! बलुच आर्मीने फासे टाकले, पाकिस्तानला तगडा झटका?
