प्रसिद्ध ‘रसना’ कंपनीच्या मालकाचे निधन

Admin
1 Min Read
‘रसना’ चे संस्थापक अरिज पिरोजशा खंबाटा निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते. रसना ग्रुपच्यावतीने सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
अरिज खंबाट्टा बेनेव्होलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्षही होते. परदेशी महाग शीतपेयांना पर्याय म्हणून खंबाटा यांनी १९७०च्या दशकात ‘रसना’ या घरगुती शीतपेयाची निर्मिती केली होती. अल्पावधीच हे शीतपेय लोकप्रिय झाले होते. आज देशभरातील १८ लाख रिटेल दुकांनांसह जगभरातील ६० देशांमध्येही रसनाची विक्री केली जाते.
रसना ही आता जगातील सर्वात मोठ्या शीतपेय उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. ८०-९० च्या दशकात आय लव्ह यू रसना या जाहिरातीने धुमाकूळ घातला होता. हा ब्रँड लोकप्रिय बनवण्यात या जाहिरातीचाही हातभार होता. ५ रुपयांच्या रसनाच्या पॅकेटमध्ये ३२ ग्लास सॉफ्टड्रिंक्स तयार केले जात होता. त्याअर्थाने एका ग्लासची किंमत केवळ १५ पैसे इतकी होती.
Share This Article