थेट अजितदादांशी पंगा!

Admin
2 Min Read
  • सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये अवैध मुरूम उत्खननावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला आयपीएस (डीएसपी) अधिकाऱ्याला फोनवरून दम दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर आयपीएस अंजली कृष्णा या चर्चेचा विषय बनल्या आहेत.
  • माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये अवैध मुरूम उत्खननाची तक्रार स्थानिक प्रशासनाकडे आली होती. यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी यांच्यासह सरकारी पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, तेथे उपस्थित काही स्थानिकांनी लाठ्या-काठ्या घेऊन अधिकाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तणाव वाढला.
  • याचवेळी, करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा आपल्या टीमसह तिथे दाखल झाल्या. त्यांनी परिस्थिती हाताळत अवैध उत्खननावर कारवाई सुरू केली. मात्र, कारवाई सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने थेट अजित पवारांना फोन लावला. या फोनवर अजितदादा यांनी थेट कृष्णा यांच्याशी संपर्क साधून त्यांना दम दिल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने राजकीय स्वरूप धारण केले आहे.
  • अंजना कृष्णा यांचे पूर्ण नाव अंजना कृष्णा व्ही.एस. आहे. अंजना कृष्णा यांची ओळख एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक आयपीएस अधिकारी म्हणून आहे.
  • कृष्णा यांनी यूपीएससी सीएसई 2022-23 परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर ३५५ वा क्रमांक मिळवला होता. केरळमधील तिरुवनंतपुरम येथे जन्मलेल्या कृष्णा यांचे वडील बीजू यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे. तर त्यांची आई सायना न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करतात.
  • दरम्यान अजितदादा यांच्यासोबतच्या वादामुळे सध्या कृष्णा यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे अनेकजण कौतुक करत आहेत. 
Share This Article